महेश मिलके स्विमिंग ग्रुपची आंतरराष्ट्रीय भरारी

0

रत्नागिरी : पुणे बालेवाडी येथे 13 ते 15 ऑगस्ट 2022 रोजी संपन्न झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये महेश मिलके स्विमिंग ग्रुपने आंतरराष्ट्रीय स्तरावर भरारी मारली आहे.

बॅटल, (रन स्विम रन), थ्रीटल, ( रन स्विम शूट)व लेझर रन( रन अँड शूट) अशा स्पर्धा संपन्न झाल्या. सदर स्पर्धेमधून पोर्तुगाल येथे वर्ल्ड चॅम्पियनशिप साठी स्पर्धकांची निवड करण्यात आली. स्पर्धेमध्ये देशभरातून वेगवेगळ्या वयोगटातून सुमारे 700 ते 800 स्पर्धक सहभागी झाले होते. सदर स्पर्धेमध्ये महेश मिलके स्विमिंग ग्रुपचे 19 स्पर्धकानी मॉडर्न पॅथलोन असोसिएशन ऑफ रत्नागिरी यांच्यामार्फत सहभागी झाले होते. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र, आंध्र प्रदेश ,पश्चिम बंगाल, ओडीसा, झारखंड, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, कर्नाटक, तेलंगणा आणि हरियाणा या राज्यातून 700 ते 800 स्पर्धक सहभागी झाले होते.

सदर स्पर्धेमध्ये महेश मिलके स्विमिंग ग्रुपच्या खालील खेळाडूंनी यश प्राप्त केले.
1) करन महेश मिलके (वयोगट 19 ते 21) रन शूट रन (गोल्ड मेडल) प्रथम क्रमांक ,बॅटल (सिल्वर मेडल) द्वितीय क्रमांक ,थ्रीटल (सिल्वर मेडल) द्वितीय क्रमांक
2 ) सागर तलवारला (वयोगट 21 ते 39) बॅटल ( सिल्वर मेडल) द्वितीय क्रमांक ,रन शूट रन (ब्रांच मॅडम) तृतीय क्रमांक
3) आर्यन प्रशांत घडशी ( वयोगट 19 वर्षाखालील) थ्रीटल (सिल्वर मेडल) द्वितीय क्रमांक ,बॅटल (ब्राँझ मेडल )तृतीय क्रमांक
4 ) आयुष काळे( तेरा वर्षाखालील )रिटर्न (सुवर्णपदक)प्रथम क्रमांक, बॅटल (सिल्वर मेडल) द्वितीय क्रमांक ,रन सुट रन (ब्राँझ मेडल) तृतीय क्रमांक 5) निधी शरद भिडे (वयोगट 11 वर्षाखाली )थ्रीटल (सिल्वर मेडल )द्वितीय क्रमांक ,बॅटल (सिल्वर मेडल) द्वितीय क्रमांक ,रन शूट रन ( ब्राँझ मेडल)तृतीय क्रमांक 6) कार्तिकी प्रकाश भुरवणे- बेटल (ब्राँझ मेडल)तृतीय क्रमांक ,बॅटल (ब्राँझ मेडल) तृतीय क्रमांक
7) सोहम शशिकांत साळवी -रन शूट रन(ब्राँझ मेडल ) तृतीय क्रमांक या स्पर्धकांनी राष्ट्रीय स्पर्धेमध्ये पथकांची लयलूट केली आणि महाराष्ट्र राज्याकरता मिळवून दिले.22 ते 25 सप्टेंबर 2022 व 24 ते 30 ऑक्टोबर 2022 पोर्तुगाल येथे होणाऱ्या स्पर्धेकरिता निवड झाली आहे .तसेच महाराष्ट्र कडून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या बेस्ट टाइमिंग दिलेल्या तनया महेश मिलके, योगेंद्र गिरीधर तावडे ,निपुण सचिन लांजेकर या तीन खेळाडूंची विशेष खेळाडू म्हणून आंतरराष्ट्रीय स्पर्धेकरिता निवड झाली आहे.

सदर खेळाडूंना मॉडर्न असोसिएशनचे अधिकृत प्रशिक्षक श्री महेश शंकर मिलके यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. संघटनेचे अध्यक्ष डॉ. निलेश शिंदे ,सेक्रेटरी डॉ. निशिगंधा पोंक्षे यांनी विशेष सहकार्य केले सदर स्पर्धेमध्ये सानवी पवार,आर्या जवादे ,आरोही पिळणकर ,अथर्व पिलणकर ,अर्पिता जांभळे मानस जांभळे ,अथर्व रणधीर ,आर्या रणधीर या स्पर्धकाने स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन स्पर्धा उत्तमरीत्या पार पाडली.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:04 AM 17/Aug/2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here