सर्वोच्च न्यायालयानं एआयएफएफ निलंबनाबाबतची सुनावणी पुढे ढकलली

0

नवी दिल्ली : जागतिक फुटबॉल संघटना म्हणजेच फीफाच्या भारतीय फुटबॉल महासंघावरील निलंबनाच्या कारवाईप्रकरणी बुधवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली.

HTML tutorial

मात्र, अद्याप या प्रकरणाबाबत तोडगा निघाला नाही. सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी 22 ऑगस्टपर्यंत पुढे ढकलली आहे. फीफानं केलेल्या निलंबनाच्या कारवाईमुळं ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या अंडर-17 महिला विश्वचषक अडचणीत आला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने 18 मे रोजी भारतीय फुटबॉल महासंघाचे प्रशासन हाताळण्यासाठी 3 सदस्यीय समिती नियुक्त केली. सर्वोच्च न्यायालयाचं माजी न्यायाधीश न्यायमूर्ती अनिल दवे, माजी मुख्य निवडणूक आयुक्त एसवाय कुरेशी आणि भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार भास्कर गांगुली या समितीचे सदस्य आहेत. याआधी, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या अध्यक्षतेखालील कार्यकारिणी जवळपास 10 वर्षे एआयएफएफवर नियंत्रण ठेवत होती. एआयएफएफमध्ये बराच काळ निवडणुका झाल्या नाहीत. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड, सूर्यकांत आणि पीएस नरसिम्हा यांच्या खंडपीठानं स्पष्ट केले होते की, ही एक अंतरिम व्यवस्था आहे. एआयएफएफची नवीन घटना तयार झाल्यानंतर तिच्या निवडणुका होतील.

फिफाचं स्पष्टीकरण
फिफाने म्हटले की, अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनच्या कार्यकारी समितीचे अधिकार स्वीकारण्यासाठी प्रशासकांची समिती स्थापन करण्याचा प्रस्ताव रद्द करण्याचा निर्णय मागे घेतल्यानंतर आणि फुटबॉल फेडरेशनकडे संपूर्ण अधिकार आल्यानंतर ही निलंबनाची कारवाई मागे घेण्यात येणार असल्याचे फिफाने स्पष्ट केले. भारतीय क्रीडा मंत्रालयाच्या संपर्कात असून सकारात्मक तोडगा निघेल अशी आशा फिफाने व्यक्त केली आहे.

फिफा काय आहे?
जागतिक फुटबॉल संघटना र्थात ‘फिफा’ ही फुटबॉलबाबतची आंतरराष्ट्रीय संघटना आहे. ‘फिफा’ हे फ्रेंचमधील इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ फुटबॉल असोसिएशनचे संक्षिप्त रुप आहे. क्रिकेटमध्ये आयसीसीकडून नियमन केले जाते. त्याच प्रमाणे फिफाकडून फुटबॉलचे नियमन केले जाते. फुटबॉलशी संबंधित आंतरराष्ट्रीय सामने, विविध स्पर्धांचे आयोजन फिफाकडून करण्यात येते. जगातील जवळपास 211 देश फिफाचे सदस्य आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:50 PM 17/Aug/2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here