हेल्थ केअर लांजा आयोजित रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

0

लांजा : कोरोना च्या पार्श्र्वभूमीवर हेल्थ केअर ग्रुप लांजाच्या वतीने लांजा येथे आयोजित रक्तदान शिबीराला रक्तदात्यांनी ऊस्फुर्त प्रतिसाद दिला. एकूण 26 बाटल्या रक्तदान झाले. कोरोना विषाणूचा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेता या राष्ट्रीय आपत्तीत रक्ताचा तुटवडा पडू नये म्हणून हेल्थ केअर ग्रुप लांजाच्या वतीने आज हे शिबीर आयोजित केले होते. शहरातील संकल्प सिद्धी बहुउद्देशीय सभागृहात आयोजित केलेल्या या शिबिरात 167 रक्तदात्यांनी नोंदणी केली होती. मात्र वेळे अभावी आणि गर्दी होऊ नये यासाठी सर्वांना रक्तदान करणे शक्य झाले नाही. राष्ट्रीय आपत्तीच्या वेळी एक जबाबदार भारतीय नागरिक म्हणून रक्तदान हेच सर्वश्रेष्ट दान हे लक्षात घेऊन रक्तदान करण्यासाठी रक्तदात्यांनी दिलेल्या ऊस्फुर्त प्रतिसादा बद्दल आयोजकांनी त्यांचे आभार मानले. रक्तदान शिबिरासाठी हेल्थ केअर ग्रुप लांजाचे पदाधिकारी संजय यादव, श्री भिंगार्डे , अमेय कोत्रे, प्रवीण जेधे, पांडुरंग कुरूप, मिलिंद लांजेकर, जावेद नाईक,अॅड. राजेश गुरव, अॅड. लिना जेधे आणि डॉक्टर वर्ग यांनी प्रयत्न केले.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
05:38 PM 05/Apr/2020

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here