भाजपची केंद्रीय निवडणूक समिती आणि संसदीय मंडळ जाहीर; गडकरींना वगळले, फडणवीसांना संधी

0

नवी दिल्ली : भाजपने त्यांचे संसदीय मंडळ आणि केंद्रीय निवडणूक समिती जाहीर केली आहे.

HTML tutorial

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना संसदीय मंडळातून वगळण्यात आलं आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा हे या संसदीय मंडळाचे आणि भाजपच्या निवडणूक समितीचे अध्यक्ष असतील. सर्बानंद सोनोवाल आणि बी एस येडियुरप्पा यांचा भाजपच्या बोर्डात समावेश करण्यात आला आहे. संसदीय मंडळ ही भाजपची सर्वात शक्तिशाली संस्था मानली जाते. पक्षाचे सर्व मोठे निर्णय या मंडळाच्या माध्यमातून घेतले जातात.

दरम्यान, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना संसदीय मंडळात स्थान मिळाले नाही, परंतू, त्यांना निवडणूक समितीचे सदस्य बनवण्यात आले आहे. ही आणखी एक ताकदवान संस्था आहे. तसेच वनमंत्री भूपेंद्र यादव आणि मूळचे राजस्थानचे असलेले ओम माथूर यांनाही या निवडणूक समितीमध्ये स्थान देण्यात आले आहे.

भाजपच्या संसदीय मंडळाची संपूर्ण यादी

जगत प्रकाश नड्डा (अध्यक्ष)
पंतप्रधान नरेंद्र मोदी
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह
गृहमंत्री अमित शाह
बी. एस येडियुरप्पा
सर्बानंद सोनोवाल
के लक्ष्मण
इक्बाल सिंग लालपुरा
सुधा यादव
सत्यनारायण जातिया
बी एल संतोष (सचिव)

भाजपची केंद्रीय निवडणूक समिती

जगत प्रकाश नड्डा (अध्यक्ष)
पंतप्रधान नरेंद्र मोदी
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह
गृहमंत्री अमित शाह
बी. एस येडियुरप्पा
सर्बानंद सोनोवाल
के लक्ष्मण
इक्बाल सिंग लालपुरा
सुधा यादव
सत्यनारायण जातिया
भूपेंद्र यादव
देवेंद्र फडणवीस
ओम माथूर
बी.एल.संतोष (सचिव)
वनथी श्रीनिवास (पदसिद्ध)

संसदीय मंडळ ही एक शक्तिशाली संस्था

भाजपचे संसदीय मंडळ हे पक्षाची सर्वात शक्तिशाली संस्था म्हणून ओळखले जाते. राष्ट्रीय स्तरावर किंवा कोणत्याही राज्यात युतीबाबतची चर्चा झाल्यास त्याबाबतचा अंतिम निर्णय संसदीय मंडळाचा असतो. याशिवाय राज्यांमध्ये विधान परिषद किंवा विधानसभेत नेता निवडण्याचे कामही हेच मंडळ करते.

निवडणूक समितीची ताकद काय?

निवडणूक समिती ही भाजपमधील दुसरी सर्वात शक्तिशाली संस्था म्हणून ओळखली जाते. लोकसभा ते विधानसभा निवडणुकीच्या तिकिटांचा निर्णय निवडणूक समितीचे सदस्य घेतात. याशिवाय थेट निवडणुकीच्या राजकारणात कोण येणार आणि कोणाला या राजकारणापासून दूर ठेवले जाणार हेही ठरवले जाते. निवडणूक कामकाजाचे सर्व अधिकार पक्षाच्या निवडणूक समितीकडे असतात.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:09 PM 17/Aug/2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here