धार्मिक तेढ निर्माण होईल असा व्हिडीओ फेसबुकवर टाकणाऱ्यावर गुन्हा दाखल

0

रत्नागिरी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच शासकीय यंत्रणा जीव तोडून काम करत आहेत. अशातच २४ तास ड्युटी करणारे पोलीस दल आता नागरिकांच्या नजरेत हिरो ठरू लागले आहेत. या भीषण रोगाच्या संकटाने पोलीस आणि नागरिक यांच्यामध्ये एक संवेदनशील नाते निर्माण झाल्याचे पहावयास मिळत आहे. संचारबंदी काळात रत्नागिरी पोलीस दलाने घेतलेली मेहनत फक्त कायदा व सुव्यवस्थे पुरती न रहाता अगदी दडलेल्या कोरोना बाधित रुग्णाला शोधून काढेपर्यंत दिसून येत आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, अप्पर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, रत्नागिरी शहर पोलीस निरीक्षक अनिल लाड, वाहतूक पोलीस निरीक्षक अनिल विभूते, ग्रामीण पोलीस निरीक्षक सुरेश कदम आणि संपूर्ण पोलीस दल जीव तोडून काम करत आहेत. साहजिकच याच कारणांसाठी हि सर्व मंडळी आता नागरिकांच्या नजरेत हिरो बनू लागली आहेत. या सर्व टीमचे कप्तान असणारे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांचा फोटो अनेकांच्या डीपीला आता दिसू लागला आहे. काहींनी तर यांचे फोटो घेऊन त्याला सिंघम चित्रपटातील गाणे जोडून टिकटॉक वर व्हिडीओ देखील केलेले पहावयास मिळत आहेत. आज रत्नागिरी पोलीस दलाचा प्रत्येक नागरिकाला अभिमान वाटत आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
10:40 PM 05/Apr/2020

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here