राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे रत्नागिरीत दहीहंडी उत्सव

0

रत्नागिरी : कोरोनाचे नियम शिथिल झाल्यावर दोन वर्षांनी राष्ट्रवादी काँग्रेसने यंदा मोठ्या उत्साहात दहीहंडी उत्सव २०२२ या स्पर्धेचे आयोजन केले आहे. तालुका आणि शहर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे याचे आयोजन करण्यात आले आहे.

सर्व नियमांचे पालन करून गोविंदाच्या सुरक्षेची काळजी घेऊन शहरातील आठवडा बाजार येथे सायंकाळी पाच ते रात्री दहा या वेळेत ही स्पर्धा होईल. जास्तीत जास्त थर लावणाऱ्या गोविंदा पथकाला ११ हजार १११ रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. यावेळी रत्नागिरी व मुंबईतील नावलौकिक कलाकार द सेजल डान्स यांच्यामार्फत नृत्याविष्कार होईल, अशी माहिती राष्ट्रवादीचे रत्नागिरी तालुका कार्याध्यक्ष मनू गुरव यांनी दिली.

पक्षाच्या जयस्तंभ येथील संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी तालुका युवक अध्यक्ष सिद्धेश शिवलकर, संकेत कदम, मंदार नैकर आदी उपस्थित होते.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:48 PM 18/Aug/2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here