मुंबई : यंदा गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्यांसाठी प्रथमच मेमू अर्थात मेनलाइन इलेक्ट्रिकल मल्टिपल युनिट हि गाडी सोडण्याचा निर्णयही मध्य रेल्वेने घेतला आहे.
त्याच्या एकूण ३२ फेऱ्या होणार असून रोहा-चिपळूणदरम्यान १९ ऑगस्टपासून चालवण्यात येतील. प्रवाशांचा चिपळूणपर्यंत अवघ्या ९० रुपयांत प्रवास होणार आहे. मेमू गाड्यांच्या ३२ फेऱ्या होतील.
त्यामध्ये,
गाडी क्रमांक ०११५७
रोहा येथून १९ ऑगस्ट, २१ ऑगस्ट, २७ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर आणि १० ते १२ सप्टेंबरला सकाळी ११.०५ वाजता सुटेल. चिपळूण येथे दुपारी १.२० वाजता गाडी पोहोचेल.
गाडी क्रमांक ०११५८
१९ ऑगस्ट, २१ ऑगस्ट, २७ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर आणि १० ते १२ सप्टेंबर या तारखांना चिपळूण स्थानकातून दुपारी १.४५ वाजता सुटणार आहे. रोहा येथे सायंकाळी ४.१० वाजता पोहोचेल.
आठ डब्यांची मेमू माणगाव, वीर, करंजाडी, विन्हेरे, खेड स्थानकात थांबेल. या गाडीच्या एकूण ३२ फेऱ्या होणार आहेत. त्यामुळे गणेशोत्सवानिमित्त कोकणासाठी आतापर्यंत एकूण १९८ विशेष फेऱ्या सोडण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:43 PM 18/Aug/2022
