खेडमध्ये आमदार योगेश कदम पुरस्कृत दीड लाखाची हंडी

0

खेड : खेड शिवसेना व युवासेनेच्या वतीने यावर्षी आ. योगेश कदम पुरस्कृत दहीहंडी उत्सव जल्लोषात साजरा करण्यात येणार असून, तीनबत्ती नाका येथे १ लाख ५१ हजार रुपयांचे बक्षीस मानाची हंडी फोडणाऱ्या गोविंदा पथकाला देण्यात येणार आहे.

HTML tutorial

खेड शहरात सालाबादप्रमाणे शिवसेना व युवा सेनेतर्फे दहीहंडी उत्सव साजरा करण्यात येणार आहे. शहरातील तीनबत्ती नाका येथे या उत्सवाची तयारी करण्यात येत आहे. चित्रपट अभिनेत्री सुरभी मसनाळे – मोरे आणि डान्स ग्रुप मुंबई यांचा कार्यक्रम यावेळी होणार आहे. यावर्षीच्या उत्सवात महिला गोविंदा पथकासाठी रोख पारितोषिक व सन्मानचिन्ह देण्यात येईल. तसेच दहीहंडी उत्सवस्थळी येणाऱ्या प्रत्येक गोविंदा पथकाला यशस्वी सलामीसाठी रोख पारितोषिक व सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे.

उत्सवाची तयारी निकेतन पाटणे, प्रेमल चिखले, सचिन धाडवे, सिध्देश खेडेकर, आनंद घोले, अभिजित चिखले यांसह शिवसेना व युवासेना कार्यकर्ते करत आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:53 PM 18/Aug/2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here