Breaking: हरिहरेश्वरच्या समुद्र किनाऱ्यावर शस्त्रास्त्रांनी भरलेली बोट सापडल्याने खळबळ; हायअलर्ट जारी

0

रायगड : रायगडच्या हरिहरेश्वरमध्ये समुद्र किनाऱ्यावर एक बोट संशयास्पद स्थितीत आढळून आली आहे. या बोटीत शस्त्रास्त्रं सापडली आहेत. पोलीस आणि जिल्हा प्रशासन घटनास्थळी दाखल झालं आहे. पोलिसांनी रायगड जिल्ह्यात हाय अलर्ट जारी केला आहे.

HTML tutorial

रायगडमधील हरिहरेश्वरमध्ये शस्त्रास्त्रांनी भरलेली बोट आढळली आहे. ही बोट पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीनं किनाऱ्यावर आणली. या बोटीत एके-४७ रायफल आणि शस्त्रास्त्रं आढळून आल्याची माहिती मिळत आहे. वरिष्ठ पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. सध्या रायगड पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.

अनोळखी बोट आढळल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे. मात्र कोणीही घाबरू नका. तपास सुरू असल्याचं पोलिसांकडून सांगितलं जात आहे. बोटीमध्ये कोणीही व्यक्ती आढळून आलेली नाही. त्यामधील वस्तू, साहित्याची तपासणी करण्यात येत आहे. या बोटीबाबत तातडीने जिल्हा प्रशासनाकडून तटरक्षक दल (कोस्ट गार्ड) व एमएमबी यांना याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.

नागरिकांनी घाबरून न जाता कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नये. अनोळखी वस्तू व्यक्तीबाबत तातडीने पोलीस व जिल्हा प्रशासनाला माहिती द्यावी, असं आवाहन रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी केलं आहे.

रायगडच्या किनाऱ्यावर अशा प्रकारे शस्त्रास्त्रांनी भरलेली बोट आढळून सुरक्षेच्या दृष्टीकोनातून अतिशय गंभीर आहे. या संपूर्ण घटनेची तपास यंत्रणांमार्फत करण्यात यावी, अशी मागणी रायगडचे खासदार सुनिल तटकरेंनी केली आहे. १९९३ मध्येही समुद्र किनारी अशी बोट आढळून आली होती. त्यानंतर पुढे काय झालं याची सगळ्यांना कल्पना आहे. त्यामुळे या बोटीचा तपास व्हायला हवा. राज्य आणि केंद्र सरकारनं यंत्रणांच्या माध्यमातून याचा तपास करायला हवा, असं तटकरे म्हणाले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:03 PM 18/Aug/2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here