ना. उदय सामंत पुरस्कृत श्री प्रतिष्ठान आयोजित दहीहंडी उत्सव २०२२ यंदा भव्यदिव्य स्वरूपात

0

प्रमोद महाजन क्रीडा संकुल मैदान येथे साजरा होणार उत्सव

रत्नागिरी : नामदार उदय सामंत पुरस्कृत श्री प्रतिष्ठान आयोजित यंदाचा दहीहंडी उत्सव भव्यदिव्य स्वरूपात साजरा होणार आहे.

कोविड कालावधीत कोणतेच उत्सव साजरे झाले नव्हते. दोन वर्षानंतर हा उत्सव साजरा होत असल्याने श्री प्रतिष्ठानचे कार्यकर्ते मोठ्या उत्साहात तयारीला लागले आहेत. संपूर्ण रत्नागिरी शहरात या दहीहंडी उत्सवाचे बॅनर लागले असून, यंदाचा हा दहीहंडी महोत्सव प्रमोद महाजन क्रीडा संकुल येथे संपन्न होणार आहे. प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी या क्रीडा संकुलांची साफसफाई करून पूर्ण मैदान सज्ज केले आहे.

डॉल्बीचा आवाज, तरुणाईचा जल्लोष आणि एक जबरदस्त थरार अनुभवण्यासाठी मैदान सज्ज झाले आहे. या दहीहंडी उत्सवाला रत्नागिरीकर मोठ्या संख्येने उपस्थित राहणार याची खात्री कार्यकर्त्यांना असल्याने खबरदारी म्हणून प्रतिष्ठानने योग्य नियोजनावर भर दिला आहे.

यंदाची प्रमोद महाजन क्रीडा संकुल मधील दहीहंडी ही गर्दीचे सर्व रेकॉर्ड मोडणार असा विश्वास प्रतिष्ठानकडून केला जातोय.
या स्पर्धे विषयी अधिक माहिती हवी असल्यास प्रतिष्ठानचे प्रथमेश साळवी 9503603835, अभिजीत दुडे 8788096634 याना संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:16 PM 18/Aug/2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here