मुंबईत ठिकठिकाणी नाकाबंदी; श्रीवर्धनमध्ये आढळलेल्या बोटीच्या घटनेनं हायअलर्ट

0

मुंबई : रायगडमध्ये श्रीवर्धनच्या समुद्रकिनारी एका संशयास्पद स्पीडबोटमध्ये एके-४७ आणि जीवंत काडतुसं आढळून आल्यानंतर राज्याचं पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर आलं आहे.

HTML tutorial

रायगडमधील संशयित बोटीच्या पार्श्वभूमीवर आता मुंबईतही पोलिसांनी नाकाबंदी सुरू केली आहे. मुंबईच्या समुद्रकिनारी पोलीस सतर्क झाले आहेत. तसंच वरळी, दादर, वांद्रे, नरीमन पॉइंट इथं पोलिसांनी नाकाबंदीला सुरुवात केली आहे.

मुंबईच्या महत्वाच्या ठिकाणी पोलिसांकडून वाहनांची तपासणी करुनच सोडलं जात आहे. श्रीवर्धनला आढळलेल्या या संशयास्पद बोटीच्या घटनेनंतर राज्याचे एटीएस प्रमुख विनित अग्रवाल त्यांच्या एका टीमसह श्रीवर्धनला तातडीनं रवाना झाले आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार राज्याच्या संपूर्ण समुद्रकिनाऱ्यावर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

रायगडचा समुद्रकिनारा याआधीपासूनच संवेदनशील राहिला आहे. १९९३ मध्ये रायगड जिल्ह्यात दिघी व शेखाडी बंदरात एके ५६ बंदुका व आरडीएक्सचे साठे उतरविण्यात आले. त्यानंतर १२ मार्च, १९९३ रोजी मुंबईतील शेअर बाजार, एअर इंडिया इमारत, सेंचुरी बाजार, प्लाझा सिनेमा, नायगाव, विमानतळ प्रवेशद्वार आदी ठिकाणी बॉम्बस्फोट घडविण्यात आले. त्यात २५७ जण ठार झाले होते. त्यामुळे इतिहास पाहता राज्याचं पोलीस प्रशासन आता अलर्ट मोडवर आलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here