रत्नागिरी : आज सोमवार 6 एप्रिल हा दिवस bjp रत्नागिरी सध्याच्या कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर सेवादीन म्हणून साजरा करणार आहे. 1980 साली 6 एप्रिल रोजी श्रध्येय अटलबिहारी वाचपेयी आणि खा. लालकृष्ण अडवाणी यांच्या नेतृत्वाखाली bjp ची स्थापना झाली. आज bjp नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली केंद्र शासनात तसेच अनेक राज्यात सत्तास्थानी असून लोकशाही राज्य प्रणालीतील अनेक सत्ताकेंद्र bjp च्या अधिपत्याखाली आहेत. आज कोरोना विरुद्ध लढ्यात शासनासह bjp ही जनतेच्या साठी झटत आहे. गरजूना अन्न पुरवठा, शिधा वाटप, रक्तदान, प्रशासनाबरोबर समन्वय या कामात bjp चे हजारो कार्यकर्ते पदाधिकारी लोकप्रतिनिधी कार्यरत आहेत. रत्नागिरी मध्येही आजपर्यंत 2000 घरांपर्यंत शिधा वाटप करण्यात आले तर 8000 लोकांना मास्क पुरवण्यात आले. शिधा, मास्क, अन्न पुरवठा ह्या गोष्टी ही bjp चे कार्यकर्ते गरजू पर्यंत पोचवत आहेत. आज वर्धापन दिनाचे औचित्य साधून 5000 लोकांपर्यंत शिधारुपी मदत पोचवली जाईल. सर्व तालुका अध्यक्ष नगरसेवक आज स्वतः सेवा कार्यात उतरतील. आजचा दिवस सेवा दिवस म्हणून साजरा केला जाईल. bjp कार्यकर्ते सर्वदूर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना भ्रमणध्वनी वरून संपर्क करतील आणि सेवा कार्यासाठी शुभेच्छा देतील. जिल्हाध्यक्ष म्हणून मी स्वतः या सेवा कार्यात सहभागी होणार असून मी स्वतः 200 कार्यकर्त्यांना मोबाईलचे माध्यमातून संपर्क करणार आहे, अशी माहिती रत्नागिरी bjp जिल्हाध्यक्ष दीपक पटवर्धन यांनी दिली.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
9:55 AM 06-Apr-20
