Breaking: महाराष्ट्रात हायअलर्ट जारी; संशयास्पद व्यक्ती दिसल्यास पोलिसांना कळवण्याचं आवाहन

0

मुंबई : रायगडच्या समुद्रकिनारी २ संशयास्पद बोटी आढळल्या. सकाळी ८ वाजता स्थानिकांनी या बोटी पाहिल्या त्यानंतर बोटीत मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा असल्याचं दिसलं.

HTML tutorial

स्थानिकांनी ही माहिती पोलिसांना दिली आहे. सध्या पोलीस या संशयास्पद बोटीबाबत तपास करत आहेत. परंतु या घटनेमुळे महाराष्ट्रात हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस अधिकाऱ्यांची चर्चा केली आहे.

राज्यात समुद्र किनारी जिल्ह्यांमध्ये पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था वाढवली असून मुंबईतही ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. कुणीही संशयास्पद व्यक्ती आढळल्यात त्याबाबत तात्काळ पोलिसांना कळवण्याचं आवाहन प्रशासनाने दिले आहे. कॉम्बिंग ऑपरेशन सुरू केले आहे. पेट्रोलिंग वाढवण्यात आली आहे. महाराष्ट्र एटीएसचे प्रमुख रायगडच्या दिशेने रवाना झाले आहेत. राज्याची गुप्तचर यंत्रणा केंद्राशी समन्वय साधत आहे. राज्याला जी जी मदत हवी आहे ती केंद्राकडून पुरवली जात आहे. या संपूर्ण परिस्थितीवर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस लक्ष ठेवून आहेत.

राज्याकडून केंद्राच्या सुरक्षा यंत्रणांना माहिती देण्यात आली आहे. समुद्रीमार्गे मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला होता. ही बोट महाराष्ट्रात आली असली तरी इतर राज्यात या बोटीतली लोकं उतरलीत का? याबाबत केंद्राकडून इतर राज्यांनाही कळवण्यात आले आहे. याबाबत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे विधानसभेत निवेदन जारी करणार आहेत. अधिवेशन सुरु असल्याने सभागृहात याबाबत माहिती देतील. आमदारांनी हा मुद्दा सभागृहात उपस्थित केला होता.

संशयास्पद बोट यूकेची
मिळालेल्या माहितीनुसार, ही बोट यूकेत रजिस्टर्ड आहे. यूकेतील एका कंपनीच्या नावावर ही बोट आहे. त्याची पडताळणी पोलिसांनी केली आहे. त्याचसोबत २ व्यक्तींबाबत पोलिसांना कळालं आहे. त्याचे पुरावे पोलिसांच्या हाती सापडले आहेत. या दोन्ही व्यक्ती इंडोनेशियाच्या नागरिक असल्याचं पुढे आलं आहे. तसेच एका ऑस्टेलियन नागरिकाबाबतही काही कागदपत्रे पोलिसांना सापडली आहेत.

ही लोकं कुठे आहेत त्याची माहिती पोलीस घेत आहेत. ही बोट ओमान येथे रेस्क्यू करण्यात आली होती. तिथे स्थानिक प्रशासनाने त्यांना रेस्क्यू केले होते. रेस्क्यू झाल्यानंतर ओमानमध्ये ही बोट ठेवण्यात आली होती. परंतु समुद्र खवळलेला असल्याने ही बोट तिथून अरबी समुद्रातून वाहत रायगडच्या दिशेला पोहचली. सकाळी ८ वाजता स्थानिकांना ही बोट दिसली. काही लोक बोटीवर गेले तेव्हा हत्यारांचा साठा सापडला. त्यानंतर पोलिसांना माहिती कळवण्यात आली.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:59 PM 18/Aug/2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here