मयेकर कला व वाणिज्य महाविद्यालयात गोपाळकाल्याच्या पार्श्वभूमीवर दहीहंडीचा उत्सव जल्लोषात साजरा

0

जाकादेवी/ संतोष पवार : गोपाळकाला दहीहंडीच्या पार्श्वभूमीवर चाफे मयेकर महाविद्यालयीन विद्यार्थी, कनिष्ठ महाविद्यालय तसेच माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी दहीहंडीचा उत्सव बेंजोच्या वाद्यावर नृत्याच्या साहाय्याने प्रत्यक्ष दहीहंडी फोडून हा पारंपारिक सांस्कृतिक उत्सव अतिशय उत्साहाने मनमुरादपणे साजरा केला.

HTML tutorial


गोपाळकाला दहीहंडीच्या पार्श्वभूमीवर चाफे येथील मोहिनी मुरारी मयेकर कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या प्रांगणात गोपाळ काला पार्श्वभूमीवर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांबरोबरच शालेय विद्यार्थ्यांनी अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये दहीहंडीचा उत्सव आनंदाने साजरा केला. बॅन्जो पार्टीच्या वाद्यावर नाच नृत्याच्या सहाय्याने अतिशय प्रसन्न आणि धार्मिक पद्धतीचा सांस्कृतिक उत्सव अतिशय उत्साहाने साजरा केला. गोविंदांना ही संधी शिक्षण संस्थेचे सचिव रोहित मयेकर यांनी उपलब्ध करून दिली.


श्रीकृष्ण जन्मदिनाचे औचित्य साधून मालगुंड एज्युकेशन सोसायटीचे संचालक व जाकादेवी विद्यालयाचे सी.ई.ओ. किशोर पाटील यांनी गोपाळकाला-कालाष्टमी निमित्ताने श्रीकृष्ण जन्म ,श्रीकृष्ण अवतार आणि भारतीय संस्कृती या संदर्भात अतिशय ओघवत्या शैलीत अभ्यासपूर्ण असे या दिवसाचे महत्त्व विशेद करून विद्यार्थ्याला विविध प्रसंगातून भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविले. यावेळी त्यांनी श्रीकृष्ण यांच्या संदर्भातील समाज प्रबोधनाचे साहित्य वाचून समजून घेण्याचे आवाहन केले.

यावेळी मोहिनी मुरारी शिक्षण संस्थेचे सचिव, युवा नेते रोहित मयेकर, ऋषिकेश मयेकर, सुरेंद्र माचिवले ,जाकादेवीचे वृत्त संकलक संतोष पवार, युवा कार्यकर्ते बंटी सुर्वे,महाविद्यालयाचे उपप्राचार्य गणेश कुळकर्णी, शिरीष मुरारी मयेकर माध्यमिक विद्यालय व सुनिल मुरारी मयेकर कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक महेश धनवडे , राजेश धावडे यांसह मार्गदर्शक प्राध्यापक,शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी ग्रामस्थ, पालक,बेंजो वाद्यांची गावची टीम, गोविंदा बहुसंख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here