राष्ट्रप्रेम…राष्ट्राभिमान प्रत्येकाच्या मनात कायम हवा; माजी सैनिक नंदकुमार चावरे यांचे प्रतिपादन

0

अ.के.देसाई हायस्कूलमध्ये माजी विद्यार्थी असलेले माजी सैनिक नंदकुमार चावरे, हेमंत देसाईंचा गौरव

रत्नागिरी : आपण या देशात राहतो त्या देशाच्याप्रती केवळ 15 ऑगस्ट किंवा 26 जानेवारीला राष्ट्रप्रेम दाखवून चालणार नाही. तर ते राष्ट्रप्रेम, राष्ट्राभिमान प्रत्येकाच्या मनात कायम असायला हवा. आपल्या देशासाठी आपण प्रत्येकाने काही ना काही महत्वपूर्ण योगदान दिलेच पाहिजे असे मत सैन्यदलातून नाईक या पदावरून सेवानिवृत्ती घेतलेले माजी सैनिक नंदकुमार चावरे यांनी व्यक्त केले.

रत्नागिरीतील मराठा मंदिर अ.के. देसाई हायस्कूल येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाचा कार्यकम 15 ऑगस्ट 2022 रोजी अत्यंत उत्साही वातावरणात साजरा झाला. या सोहळ्यासाठी याच शाळेतील सन 1993-94 च्या बŸचमध्ये दहावी होउन बाहेर पडलेले माजी विद्यार्थी व सेवानिवृत्त जवान हेमंत देसाई आणि सध्या जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय कोल्हापूर येथे सेवेत असणारे जवान नंदकुमार चावरे यांची विशेष उपस्थिती सर्वांनाच प्रेरणादायी होती. या दोन जवानांच्या उपस्थितीत शाळेतील ध्वजारोहणाचा सोहळा मोठ्या उत्साही वातावरणात पार पडला. या सोहळ्यापसंगी चावरे यांचे आर्मी मधील सेवेत असताना त्यांनी घेतलेला प्रत्येक अनुभव ऐकताना उपस्थितांच्या अंगावर रोमांच उभे केले. प्रत्येक प्रसंग जगताना त्यांनी दाखवलेले धैर्य, साहस याची प्रचिती आणून दिली. त्यांच्या प्रत्येक शब्दात भारावून टाकणारे अतुलनीय असे देशप्रेम होते. देशासाठी वाटेल ते करायला तयार असणारे जवान माझ्या शाळेचे माजी विद्यार्थी आहेत याचा मला व माझ्या शालेय कुटुंबाला सार्थ अभिमान असल्याचे पाध्यापक संतोष गार्डी यांनी त्यांच्याविषयी गौरवोद्गार व्यक्त केले.

प्रशालेमध्ये या सोहळ्यासाठी उपस्थित राहिलेल्या भारतमातेच्या या दोन जवानांचा प्रशालेतर्फे शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन मुख्याध्यापक प्रमोद शेखर, स.रा देसाई अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य नेताजी पुंभार, नगरपरिषद शाळा क्रमांक 13 चे मुख्याध्यापक बाईंग सर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. त्याचबरोबर स्काऊट गाईड विभागांतर्गत राज्य पुरस्कार मिळविणाऱया व राष्ट्रपती पुरस्कारापर्यंत प्रगती करणाया गाईड कुमारी सानिका दिलीप वाडेकर व कुमारी अलिशा सुनील जाधव यांचा सन्मान हेमंत देसाई व नंदकुमार चावरे या सैनिकांच्या हस्ते राज्य पुरस्कार प्रमाणपत्र देऊन करण्यात आला.

याप्रसंगी गाईड विभागाच्या मार्गदर्शिका गाईड कॅप्टन सौ. अंजली पिलणकर उपस्थित होत्या. ध्वजारोहणाप्रसंगी प्रशालेतील सर्व विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, बहुसंख्येने आलेले माजी विद्यार्थी, नगरपरिषद 13 चे सर्व विद्यार्थी व शिक्षक वग,& स .रा. देसाई अध्यापक विद्यालयाचे सर्व विद्यार्थी व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि नागरिक उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष शांताराम गार्डी यांनी केले. देसाई स्कूल व स. रा. देसाई अध्यापक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या देशभक्तीपर गीतानी कार्यक्रमाची सांगता झाली.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:05 AM 19/Aug/2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here