रत्नागिरी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील १३० कोटी जनतेला ५ एप्रिल रात्री नऊ वाजता नऊ मिनिटे लाइट बंद करून दरवाजात दिवा, टॉर्च, मेणबत्ती अथवा मोबाईलचा फ्लॅश लावून परिसर प्रकाशमय करा असे आवाहन केले होते. त्याला जिल्ह्यासह रत्नागिरीत मोठा प्रतिसाद मिळाला. रत्नागिरीकरांनी आपल्या घरातील लाईट बंद करून पणत्या व दिवे, फ्लॅश मेणबत्त्या लावून परिसर प्रकाशमान केला. यामध्ये मोठ्यांपासून लहानांपर्यंत सर्वजण मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते.
