रत्नागिरी जिल्हा कुस्ती असोसिएशनकडून अमित विलणकर यांचा सत्कार

0

रत्नागिरी : श्री दत्त सेवा मंडळ या चार वाड्यांच्या देवस्थानच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आल्याबद्दल रत्नागिरी जिल्हा कुस्ती असोसिएशनकडून अमित विलणकर यांचा एकमुखी दत्त मंदिरात बुधवारी सत्कार करण्यात आला. तसेच देवस्थानच्या सर्व पदाधिकार्‍यांना यावेळी गौरवण्यात आले.

HTML tutorial

रत्नागिरीतील प्रसिद्ध एकमुखी दत्त मंदिराचे नोंदणीकृत मंडळ असलेले श्री दत्त सेवा मंडळ घुडेवठार, पाटीलवाडी, विलणकरवाडी आणि चंवडेवठार या चार वाड्यांमध्ये कार्यरत आहे. रविवारी देवस्थानच्या पदाधिकार्‍यांच्या निवडी करण्यात आल्या त्यामध्ये अध्यक्षपदी अमित विलणकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली होती. त्यानिमित्ताने रत्नागिरी जिल्हा कुस्ती असोसिएशनकडून अमित विलणकर यांचा भाई उर्फ श्रीकृष्ण विलणकर, डॉ. चंद्रशेखर केळकर यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.

याशिवाय रत्नाकर उर्फ सागर सुर्वे, अजय विनायक विलणकर, विशाल उर्फ शंभू विजय मुंडे, राजेश रामदास बोरकर, पराग विजय विलणकर, मुकूंद रोहिदास विलणकर, राजेंद्र यशवंत घुडे, प्रकाश लक्ष्मण घुडे, मनोज शाम घुढे, सुरेंद्र घुडे, सुमित साईनाथ नागवेकर, अर्चना अशोक मयेकर, प्रेरणा पुरूषोत्तम विलणकर, संकेत सुगंधा चवंडे, शशांक सुरेंद्र चवंडे, किरण जगदीश खडपे यांचाही कुस्ती असोसिएशनच्या पदाधिकार्‍यांकडून सत्कार करण्यात आला व त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी कुस्ती असोसिएशनचे सदानंद जोशी, आनंद तापेकर, फैय्याज खतिब व संदेश चव्हाण उपस्थित होते.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:52 AM 19/Aug/2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here