रत्नागिरी जिल्ह्यात नाकाबंदी

0

रत्नागिरी : हरीहरेश्वर येथे संशयास्पद बोट सापडल्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यात नाकाबंदी करण्यात आली. जिल्ह्यातील सर्व चेकपोस्टवर पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला. येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांची तपासणी करण्यात आली.

HTML tutorial

समुद्रकिनाऱ्यावरही बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावेळी मच्छिमार नौकांची तपासणी करण्यात आली.

रायगड जिल्ह्यातल्या हरिहरेश्वर या ठिकाणी समुद्रकिनारी संशयास्पद बोट सापडल्यानंतर कोकणात हाय अॅलर्ट दिला आहे. गुरुवारी रत्नागिरी जिल्ह्याच्या हद्दीवर खेड तालुक्यातील कशेडी घाटातही पोलिस व होमगार्ड कर्मचारी तैनात करण्यात आले असून, वाहनांची कसून तपासणी सुरू आहे. खेड पोलिसांनी दुपारी तीन वाजल्यापासून नाकाबंदी केली.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:12 AM 19/Aug/2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here