अखेर बोरिस जॉन्सन रुग्णालयात दाखल

0

लंडन : जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोनाने आता अनेक राजकारण्यांनाही आपल्या जाळ्यात ओढले आहे. कोरोनाची लागण ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनासुद्धा झाली असून बोरिस यांच्यात कोरोनाची लक्षणे दिसल्यामुळे रात्री उशिरा रुग्णालयात दाखल करण्यात आले. याबाबत पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाची काही लक्षणे बोरिस यांच्यात दिसत असल्यामुळे बोरिस यांची डॉक्टरांनी कोरोना चाचणी केली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, बोरिस जॉन्सन यांना कोरोना झाल्याचे 10 दिवसांपूर्वी सांगण्यात आले होते. ब्रिटिश पीएमओच्या म्हणण्यानुसार त्यानंतर त्यांना डॉक्टरांच्या सल्ल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण डॉक्टरांनी कोणतीही आपत्कालीन परिस्थिती नसल्याचेही स्पष्ट केले आहे आणि जॉन्सन सरकार चालवत राहतील, असेही सांगितले. असे सांगितले जात आहे की कोरोनाची चिन्हे ब्रिटीश पंतप्रधानांना दिसल्यानंतर 26 मार्च रोजी त्यांच्या अधिकृत निवासस्थानी डाउनिंग स्ट्रीट येथे स्वत:ला क्वारंटाइन केले. बोरिस क्वारंटाइनमध्येही काम करत आहेत. त्याचबरोबर यावेळी त्यांनी देशाला एक व्हिडिओ संदेशही दिला. या व्हिडीओच्या माध्यमातून जिथे त्यांनी ब्रिटनमधील लोकांना कोरोनाशी लढा देण्याचा संदेश दिला तेथे त्यांनी आपल्या सुधारणांबद्दलही माहिती दिली. दरम्यान कोरोनाचा गंभीर परिणाम ब्रिटनमध्ये दिसत आहेत. 47 हजार 806 लोकांना देशात आतापर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. तर, 4 हजार 932 लोकांचा मृत्यू झाला आहे. ब्रिटनच्या बर्‍याच मोठ्या व्यक्तींनाही कोरोनाचा फटका बसला आहे. यामध्ये प्रिन्स चार्ल्स आणि पंतप्रधान जॉन्सन यांची नावे आहेत. कोरोनामुळे ब्रिटनमध्ये एका 5 वर्षांच्या मुलाचाही मृत्यूही झाला.

IMG-20220514-WA0009

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here