देशभरात कोरोना व्हायसरमुळे हाहाकार पसरला आहेच पण सर्वात जास्त रुग्ण असलेल्या महाराष्ट्रात आता कोरोना थांबण्याचं नाव घेत नाही आहे. देशात 4 हजारहून अधिक तर महाराष्ट्रात 781 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. मुंबई कोरोनाग्रस्तांची संख्या जास्त असल्यानं येत्या काळात बीएमसीला अधिक कडक पावले उचलावी लागणार आहे. राज्यात आज 33 नवीन रुग्ण आढळले आहेत.
