विहान प्रॉडक्शन्स रत्नागिरी यांच्या ‘११ रूपये’साठी संकेत केतन घाग यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार प्राप्त

0

रत्नागिरी : वर्ल्ड फिल्म कार्निवल सिंगापूर २०२० सीजन ५ मध्ये रत्नागिरी मधील चित्रित ११ रुपये या शॉर्ट फिल्म साठी संकेत घाग याना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक हा पुरस्कार मिळाला. कोणत्याही लांबीच्या आणि सर्व प्रकारच्या फिल्म्स च्या दिग्दर्शकांमध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून संकेत घाग यांची निवड झाली. रत्नागिरीतील सर्जक कलाकार प्रदीप शिवगण आणि परशुरामपंत अभ्यंकर प्राथमिक विद्यामंदीर रत्नागिरी मधील विद्यार्थीनी कु. कशिश सनगरे यांच्या या लघुपटामध्ये प्रमुख भूमिका आहेत. या व्यतिरिक्त मानसी पाथरे, श्रेया पांचाळ व प्रशांत महाकाळ यांनी देखील या लघुपटात महत्वपूर्ण भूमिका केलेल्या आहेत. संकेत घाग यांनी ११ रूपयेची कथा लिहालेली असून या लघुपटाचे दिग्दर्शन ही केलेले आहे. सचिन सावंत यांनी या लघुपटाचे चित्रीकरण केलेले आहे. तर शुभम वाडकर यांनी प्रकाश याेजनेची जबाबदारी पार पाडली आहे. किशोर कनोजिया व मानसी पाथरे यांनी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलेले आहे. मिलींद गोवेकर यांनी या लघुपटाला संगीत दिलेले आहे तर ऋषिकेश जोशी यांनी या लघुपटाचे संकलन केलेले आहे. रमेश कीर कला अकादमीचे विद्यार्थी दिप्ती वहाळकर व अन्य यांनी कला दिग्दर्शनाची जबाबदारी पार पाडली आहे. या लघुपटाचे सर्व चित्रीकरण रत्नागिरी मध्ये झालेले आहे. या लघु चित्रपटाला आजपर्यंत देशाविदेशातील एकूण १० पुरस्कार मिळालेले आहेत.

IMG-20220514-WA0009

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
2:19 PM 06-Apr-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here