केंद्र सरकारने आर्थिक संकटाचे आव्हान पेलण्यासाठी विरोधी पक्षांसोबत तज्ञांची मदत घ्यावी : रघुराम राजन

0

भारत स्वातंत्र्यानंतरच्या सर्वात मोठ्या आर्थिक संकटाच्या टप्प्यात आहे. सरकारने हे आव्हान पेलण्यासाठी विरोधी पक्षांसोबत तज्ञांची मदत घेतली पाहिजे, असं मत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी व्यक्त केलंय. देशात कोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेल्या आव्हानांबद्दल त्यांना खास ब्लॉग लिहिला असून, त्यात त्यांनी सरकारला पुढील संकटाबद्दल सतर्क करण्याचा प्रयत्न केला आहे. रघुराम राजन यांना सरकारला पुढील आर्थिक आरिष्टाबद्दल जागं करण्याचा प्रयत्न केलाय आहे. स्वातंत्र्यानंतर भारतासमोरचं हे कदाचित सर्वात मोठं संकट आहे. 2008-9 मध्ये आलेल्या जागतिक आर्थिक संकटावेळी मागणीत खूप मोठ्या प्रमाणात घट झाली होती. पण तेव्हा कामगार कामावर जात होते. कंपन्या इतक्या वर्षांच्या नफ्यामुळे मजबूत होत्या, असं रघुराम राजन यांनी म्हटलं आहे. दरम्यान, सरकारने गरिबांवर खर्च करण्यासाठी प्राथमिकता दिली पाहिजे. गरज नसलेला खर्च टाळला पाहिजे, असं मतही राजन यांनी व्यक्त केलं आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here