राजापूरमध्ये आज नेत्रतपासणी

0

राजापूर : जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त राजापूर तालुका फोटोग्राफर व्हिडीओग्राफर असोसिएशन व इन्फिगो आय केयर हॉस्पिटल रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार २० ऑगस्ट रोजी सकाळी १० ते सायंकाळी ४ या वेळेत जवाहर चौक राजापूर येथील पिकअप शेड हॉल येथे मोफत सर्व प्रकारची नेत्र तपासणी करण्यात येणार आहे.

राजापूर नायब तहसीलदार दीपाली पंडित व राजापूर पोलिस निरीक्षक जनार्दन परबकर तसेच रत्नागिरी जिल्हा फोटोग्राफर व्हीडिओग्राफर असोसिएशनचे जिल्हा अध्यक्ष संजय शिंदे, गुरू चौगुले, कांचन मालगुंडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे. नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन असोसिएशनचे तालुका अध्यक्ष राजेश खांबल यांनी केले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:28 AM 20/Aug/2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here