कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. या लॉकडाऊनचा फायदा घेत पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवरील ऐतिहासिक अमृतांजन पूल ब्लास्टनं उडवण्यात आला आहे. 5 एप्रिल रोजी हा ब्रिटिशकालीन पूल ब्लास्टने जमीनदोस्त करण्यात आला. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील हा ब्रिटिशकालीन अमृतांजन पूल होता. ब्लास्टनंतर काही क्षणातच हा पूल उद्धवस्त झाला. त्यामुळे हा ब्रिटिशकालीन अमृतांजन पूल अखेर इतिहासजमा झाला आहे. सुरुवातीला या पूलच्या कमानी पाडल्या गेल्या. त्यानंतर हा पूल संपूर्ण जमीनदोस्त केला गेला.
