अल्पवयीन मुलीला गर्भवती केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या आरोपीने सिंधुदुर्गातही केली मुलीची फसवणूक

0

रत्नागिरी : अल्पवयीन मुलीशी शरीरसंबंध ठेवून तिला गर्भवती ठेवल्या प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा झालेल्या कोल्हापूर येथील 24 तरूणाबाबत आता धक्कादायक माहिती पुढे येत आहे. या तरुणाने दोन अल्पवयीन मुलींची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. विकास दिलीप जाधव (24, पन्हाळा कोल्हापूर) असे आरोपीचे नाव आह़े. रत्नागिरीतील सत्र न्यायालयाने पॉक्सो गुह्याखाली जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.

दरम्यान विकास जाधव याच्यावर सिंधुदूर्ग जिल्ह्यातही अल्पवयीन मुलीची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आह़े. विकास याचा यापूर्वी सिंधुदुर्गातील एका मुलीशी विवाह झालेला असून त्याला एक मुल आह़े. सिंधुदुर्गातही त्याच्यावर गुन्हा दाखल झाल्याने तेथील खटल्यासाठी त्याला सिंधुदुर्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आह़े.

रत्नागिरीमधील एका 15 वर्षीय मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढत तिला फूस लावून पळवून नेल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होत़ा. पीडित मुलीला आई-वडील नसल्याने ती मावशीकडे वास्तव्याला होत़ी. त्या ठिकाणी एका नातेवाईकाकडे आरोपी विकास येत असे. तेथे त्याची पीडित मुलीशी ओळख झाली. त्याने त्या मुलीसोबत रत्नागिरीमधील एका मंदिरामध्ये गांधर्वविवाह केल़ा. ही घटना 18 सप्टेंबर 2018 रोजी घडली होत़ी.

लग्नानंतर आरोपी विकास हा पिडीत मुलीला घेवून कोल्हापूरला वास्तव्याला गेल़ा होता. पिडीता अल्पवयीन आहे हे माहित असतानाही त्याने तिच्याशी शरीरसंबंध प्रस्थापित केल़े. दरम्यान पिडीतेला पळवून नेल्याची तक्रार तिच्या मावशीने शहर पोलिसांत दाखल केल़ी. त्यानुसार शहर पोलिसांकडून शोध घेण्यात आल़ा. ती कोल्हापूर येथे विकास सोबत असल्याचे आढळून आल़े. पोलिसांकडून पीडित मुलीला ताब्यात घेवून तिची वैद्यकीय चाचणी केली असता ती 2 महिन्यांची गरोदर असल्याचे निष्पन्न झाल़े.
शहर पोलिसांनी विकास विरूद्ध भादवि कलम 363, 376 व पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केल़ा. त्यानंतर तपास करून न्यायालयापुढे दोषारोपपत्र ठेवल़े. पोलिसांच्या तपासामध्ये विकासचा यापूर्वी विवाह झालेला असून त्याला एक मूल असल्याचे समोर आल़े. सत्र न्यायालयाने त्याला दोषी मानून जन्मठेपेची शिक्षा सुनावल़ी. दरम्यान विकास या प्रकारचे गुन्हे करण्यात सराईत असल्याचे पोलिस तपासामध्ये दिसून आल़े. त्याच्यावर सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील अल्पवयीन मुलीला पळवून नेत तिच्याशी शरीरसंबध प्रस्थापित केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आह़े. तिच्यापासून एक मूल असल्याचे उघड झाले आहे. आता सिंधुदुर्ग कोर्ट त्याला कोणती शिक्षा देणार हे पहावं लागणार आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:06 PM 20/Aug/2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here