शाळा, महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय १४ एप्रिललाच : केंद्र सरकार

0

देशात कोरोनाने शिरकाव केल्यांनतर देशातील राज्य आणि केंद्र सरकारनं सर्व शाळा, महाविद्यालयांसह शैक्षणिक संस्था बंद करण्याचा निर्णय घेतला. सर्व शाळा, महाविद्यालयांसह अनेक परीक्षा सुद्धा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. दरम्यान आता बंद करण्यात आलेली शाळा, महाविद्यालय सुरु करण्याबाबत एक महत्वाचं वृत्त केंद्र सरकारकडून मिळत आहे. येत्या १४ एप्रिलला २१ दिवसांचा लॉकडाउन संपणार आहे. मात्र, करोनाच्या परिस्थितीचा आढावा घेऊनच शाळा महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय १४ एप्रिललाच घेण्यात येणार आहे. अशी माहिती केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल यांनी दिली आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here