दंडात्मक कारवाई करून देखील लोकं ऐकत नाहीत; आता वाहतूक परवानेच रद्द करणार

0

रत्नागिरी : कोरोनाच्या प्रतिबंधासाठी जिल्हयात सर्वत्र संचारबंदी आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवेशिवाय कोणीही घराबाहेर पडू नये घरातच थांबून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले. तरीही त्यानंतरही किरकोळ कारणासाठी वाहने घेऊन रस्त्यावर येणाऱ्यांची संख्या कमी झालेली नाही. त्यामुळे पोलिसांनी आता कडक भूमिका घेत विनाकारण रस्त्यावर वाहन घेऊन येणाऱ्या 40 वाहनधारकांवर त्यांचे वाहन परवानेच निलंबित करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला असून तसा प्रस्ताव आता परिवहन विभागाला पाठवला आहे, अशी माहिती वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक अनिल विभूते यांनी दिली आहे. तसेच संबंधित वाहन चालकांचे वाहतूक परवाने तीन महिन्यासाठी निलंबित करण्याचा करण्याचा प्रस्ताव पोलिसांनी पाठवला आहे. दंडात्मक कारवाई करून देखील लोकं ऐकत नसल्याने आता वाहन परवाना रद्द करण्याची नामी शक्कल आता पोलिसांनी काढली आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here