पन्नास खोके, खावून खावून माजले गद्दार बोके! विरोधकांच्या बंडखोर आमदारांविरोधात नव्या घोषणा

0

मुंबई : ‘पन्नाsssस खोके, खावून खावून माजले गद्दार बोके!’ अशा नव्या घोषणा आता विरोधकांनी बंडखोर आमदारांविरोधात देण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाचं लक्ष या आंदोलनानं वेधलंय.

यावेळी पुण्यात राष्ट्रवादीकडून आंदोलन केलं जातंय. यावेळी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते बंडखोरांविरोधात घोषणाबाजी करताना दिसत आहेत. तर राज्य सरकारविरोधात देखील विधीमंडळाबाहेर घोषणाबाजी केली जातेय. घोषणांमध्ये गद्दाराची भाकरी भाजपची चाकरी आणि ईडीची ज्यांच्या घरी ते ईडीच्या दारी, अशाही घोषणा देण्यात आल्या आहेत. राज्यात सध्या अधिवेशन सुरू आहे. यातच विरोधकांनी राज्य सरकारला विविध मुद्द्यांवरुन घेरल्याचं दिसतंय. तर वेगवेगळ्या घोषणा देखील दिल्या जात आहे. ‘पन्नाsssस खोके, खावून खावून माजले गद्दार बोके!’ ही घोषणा चांगलीच गाजल्याचं दिसतंय. याकडे राज्याचं लक्ष वेधलं गेलंय.

विरोधकांच्या बंडखोरांविरोधात नव्या घोषणा

विरोधकांकडून राज्य सरकारविरोधात नव्या घोषणा दिल्या आहेत. या घोषणा देखील चांगल्याच चर्चेत आल्या आहेत. त्या घोषणा कोणत्या पाहुया….

बंडखोरांविरोधात नव्या घोषणा

  1. ‘पन्नाsssस खोके, खावून खावून माजले गद्दार बोके!’
  2. गद्दाराची भाकरी भाजपची चाकरी
  3. ईडीची ज्यांच्या घरी ते ईडीच्या दारी
  4. पन्नास खोके, एकदम ओके
  5. पन्नास खोके, माजलेत बोके

विधानभवनात निदर्शने

विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली आज महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्‍यांवर येत ईडी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. अधिवेशन सुरु असताना तिसऱ्या दिवशी महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्‍यांवर येत ईडी सरकारच्या विरोधात ही घोषणाबाजी करण्यात आली. ओला दुष्काळ जाहीर करा… अतिवृष्टीग्रस्तांना मदत करा… पन्नास खोके, माजलेत बोके… पन्नास खोके, एकदम ओके… ईडी ज्याच्या घरी तो भाजपच्या दारी… स्थगिती सरकार हाय हाय… गद्दारांचं सरकार हाय हाय!!!… आले रे आले गद्दार आले… अशा गगनभेदी घोषणा देत आज पुन्हा एकदा महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्‍यांवर सरकारविरोधात जोरदार निदर्शने केली.

अधिवेशनाचा तिसरा दिवस

अधिवेशनाचा आजचा तिसरा दिवस असून महाविकास आघाडीमधील सर्व आमदारांनी सरकारला धारेवर धरण्याचे काम सुरू केले असून हे आंदोलनातून दाखवून दिले आहे. यावेळी वेगवेगळ्या घोषणा देण्यात आल्या.

पुण्यातील आंदोलनानंही अवघ्या राज्याचं लक्ष वेधलं गेलंय. राज्य सरकारविरोधात यावेळी संताप व्यक्त करण्यात आला. तर दहीहंडीच्या मुद्द्यावरुन देखील टीका करण्यात आली आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:22 PM 22/Aug/2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here