आसुद-मुरूड रस्ता खड्डेमय

0

दापोली : आसुद-मुरूड रस्त्यामध्ये पडलेल्या खड्डयांचा स्थानिक रहिवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. या खड्डयांचा जास्तीत जास्त परिणाम मुरूड कर्दे, लाडघरातील पर्यटन व्यवसायावर झाला आहे.

‘गारंबीचा बापू’ या अजरामर झालेल्या कांदबरीचा उल्लेख असलेल्या आसुद या गावातील रस्त्यात पडलेले खड्डे हे येथील स्थानिक रहिवाशांना त्रासाचे होत आहेतच शिवाय आसुदपासून जेमतेम 60 मिटर अंतरावर असलेल्या पर्यटकांचे गाव म्हणून ओळख पावलेल्या मुरूड या गावात तसेच त्यापुढील किनारपट्टीतील कर्दे लाडघर गावात जाणारे पर्यटक रस्त्याची दुरावस्था बघून आपली महागडी किमतीची वाहने या रस्त्यावरून घालण्यात धजत नाही. त्याचा थेट परिणाम हा मुरूड, कर्दे लाडघर या किनारपट्टी भागातील पर्यटन व्यवसायावर झाला आहे.

दापोली तालुक्यातील दापोली आसुद मुरूड, कर्दे लाडघरकडे जाणाऱ्या रस्त्यात ठिकठिकाणी खड्डे पडलेले आहेत. रस्त्यात पडलेल्या खड्डयांच्या खोलीची व्याप्ती पाहता हा रस्ताच आहे ना ? असे येथून जाणाऱ्यांच्या मनात आल्याशिवाय राहत नाही, असे रस्त्यात खड्ड पडलेले आहेत. या खड्डयांमध्ये पावसाच्या साचलेल्या गढूळ पाण्यामुळे येथून जाणा-या पादचाऱ्यांच्या अंगावर खड्डयात साचलेले गढूळ पाणी उडते परिणामी वादाचे खटके उडतात.

पर्यटन व्यवसायामुळे मोठया प्रमाणात मुरूड, कर्दे, लाडघर गावात रोजगार निर्मिती झालेली आहे. येथे येणा-या पर्यटकांमुळे शासनाच्या तिजोरीत कराच्या रूपाने मोठयाप्रमाणात महसुल जमा होत असताना खर तर येथील रस्त्यांची सुधारणा होणे गरजेचे होते. मात्र उदासिन प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षतेमुळे रस्त्यांची सुधारणा झालेली नाही. ही बाब येथील पर्यटन व्यवसायाच्या मुळावर चांगलीच उठली आहे.

दापोलीकडून मुरूड कर्दे समुद्रकिनाऱ्याकडे जाणारा हा महत्त्वाचा एकच मार्ग आहे. या मार्गावर एस.टी.बसेस तसेच खासगी वाहनांची कायमच वर्दळ असते. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने येथील स्थानिक रहिवाशांचा विचार करावा, येथील डांबरीकरण करावे अन्यथा खड्डे बुजवून रस्ता वाहतूकयोग्य करावा, असे येथील नागरिकांचे म्हणणे आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:40 PM 22/Aug/2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here