कोरोना लढ्याच्या निर्णायक टप्पात तरी ‘ह्या’ लोकांनी जबाबदारीनं वागावं : अजित पवार

0

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनतेला ५ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता ९ मिनिटांसाठी घरातील वीज बंद करुन घराच्या दरवाजात, बाल्कनीत दिवे, मोबाईल टॉर्च पेटवण्याचं आवाहन केलं होतं. नरेंद्र मोदींच्या आवाहनाला प्रतिसादही मिळाला पण काही उत्साही मंडळीनी पुन्हा मशाली घेऊन रस्त्यावर आले. या लोकांना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी फटकारलं आहे. राज्यात कोरोनारुग्णांची संख्या दररोज शेकडोंनी वाढत आहे. तरीही परिस्थितीचं गांभीर्य काही जणांच्या लक्षात येत नाही, हे दुर्दैवं आहे. पंतप्रधानांनी दारात, खिडकीत दिवे लावायला सांगितलं असतानाही, मशाली पेटवून लहान मुलं, महिलांना सोबत घेऊन झुंडीनं रस्त्यावर उतरणं, फटाके वाजवून आगीला कारणीभूत ठरणं, हा बेजबाबदारपणाचा कळस आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी नाराजी व्यक्त केली आहे. कोरोना लढ्याचा हा निर्णायक टप्पा सुरु झाला असून यापुढे तरी सर्वांनी जबाबदारीनं वागलं पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here