मुंबई आणि मंगळुरू जंक्शन दरम्यान 6 अतिरिक्त गणपती विशेष गाड्या

0

रत्नागिरी : गणपती उत्सव 2022 दरम्यान प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेत मध्य रेल्वे लोकमान्य टिळक टर्मिनस आणि मंगळुरु जंक्शन दरम्यान अतिरिक्त श्रीगणपती विशेष गाड्या चालवणार आहे.

मध्य रेल्वेने यापूर्वीच 212 श्रीगणपती विशेष चालवण्याची घोषणा केली आहे. या गाड्यांसह यावर्षी एकूण श्रीगणपती विशेष गाड्यांची संख्या 218 होईल.

01173 विशेष 24-8-2022, 31-8-2022 आणि 7-9-2022 (3 सेवा) रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून 20.50 वाजता सुटेल आणि मंगळुरु जंक्शन येथे दुसऱ्या दिवशी 17.05 वाजता पोहोचेल.

01174 विशेष 25-8-2022, 1-9-2022 आणि 8-9-2022 (3 सेवा) रोजी मंगळुरु जंक्शन येथून 20.15 वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी 17.30 वाजता पोहोचेल. या गाड्यांना ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवि, करमळी, मडगाव, कानकोना, कारवार, अंकोला, गोकर्ण रोड, कुमटा, होन्नावर, मुरुडेश्वर, भटकळ, मूकांबिका रोड बैन्दूर, कुंदापुरा, उडुपी, मुल्की, सुरतकल, ठोकूर येथे थांबे असतील.

विशेष गाडी क्रमाक 01173 चे विशेष शुल्कासह बुकिंग सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर आधीच उघडलेले आहे. या विशेष ट्रेनच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES ॲप डाउनलोड करा.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:08 PM 23/Aug/2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here