मुंबई-गोवा महामार्गावर 27 ऑगस्ट पासून अवजड वाहनांना बंदी

0

रत्नागिरी : गणेश चतुर्थीनिमित्त कोकणात येणार्‍या चाकरमान्यांची मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी शासनाने योग्यती खबरदारी घेतली आहे. 27 ऑगस्ट पासून या मार्गावरील वाळू, रेती व तत्सम गौणखनिजांची वाहतुक करण्यास पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे.

गणेशोत्सवासाठी एसटी महामंडळाने कोकणातील चाकरमान्यांसाठी जादा गाड्या सोडण्याची व्यवस्था केली आहे. खासगी वाहनांद्वारेही मोठ्या संख्येने चाकरमानी कोकणात दाखल होतात. यामध्ये रेती, वाळू घेऊन ये-जा करणार्‍या अवजड वाहनांची संख्या देखील मोठी असते. त्यामुळे महामार्गावर वाहतुक कोंडी होऊन प्रवाशी आणि चाकरमान्यांची गैरसोय होते. ही गैरसोय टाळण्यासाठी मोटार वाहन अधिनियम 1988 चे कलम 115 मधील तरतुदीचा वापर करून महाराष्ट्र शासन या आदेशाद्वारे सार्वजनिक हितास्तव पनवेल ते सावंतवाडी या राष्ट्रीय महामार्गावर वाळू, रेती भरलेले ट्रकची, मोठ्या ट्रेलर्सची तसेच अवजड वाहनांच्या वाहतुकीबाबत बंदी घालण्यात आली आहे.

27 ऑगस्ट पासून ही बंदी लागू करण्यात येईल. दूध, पेट्रोल-डिझेल, गॅस, लिक्विड मडिकल ऑक्सिजन व भाजीपाल इत्यादी जीवानावश्यक वस्तू वाहतुकीला यातून वगळण्यात आले आहे, असे आदेशामध्ये म्हटले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:04 AM 24/Aug/2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here