जमावबंदी डावलणाऱ्या राजीवड्यातील २०० जणांवर गुन्हा दाखल

0

राजिवडा येथे कोरोना बाधित रुग्ण आढळल्यावर हा परिसर सील करण्यात आला आहे. या भागात जमावबंदीचे आदेश डावलून बेकायदेशीर जमाव करणाऱ्या २०० जणांवर रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांमध्ये जियाउद्दीन फंसोपकर, फैजान फंसोपकर, सलमान पकाली, राहील फंसोपकर, मुज्जफर मुजावर, अरमान मुजावर, शमशुद वस्ता, नबील, अकिल, गुड्डू कोतवडेकर, जूबेड वस्ता, रिज्जू पकाली, हसनमियाँ, चर्सी बादशाह, खालिद, आपान मलबारीचा मुलगा, रियाज फँसोपकर या अठरा जणांसह आणखी 150 ते 200 अनोळखी असलेल्या आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी जमाव जमवून फिर्यादी यांचे जवळील मोबाईल व लाठी हिसकावण्याचा प्रयत्न करुन ने फिर्यादी यांचे डोक्यात मारून शासकीय कामात अडथळा केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
09:48 PM 06/Apr/2020

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here