चिपळूण : शहरातील भटकी जनावरे, गाढवे व श्वानांचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी शहर महिला सुरक्षा संघटनेतर्फे मुख्याधिकारी शिंगटे यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
शहर महिला सुरक्षा संघटनेच्या पदाधिकारी व शहर अध्यक्षा स्वाती भोजने, लता भोजने, तृप्ती कदम, शमिना परकार आदींनी मुख्याधिकारी शिंगटे यांना दिलेल्या निवेदनानुसार, शहरातील साफसफाई, अंतर्गत नादुरूस्त रस्ते तसेच भटकी जनावरे, कुत्रे याबाबत गांभीर्याने दखल घ्यावी असे नमूद केले आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:35 AM 25/Aug/2022