रत्नागिरी नगर परिषदेतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा

0

रत्नागिरी : रत्नागिरी नगर परिषदेमार्फत गणेशोत्सव २०२२ व माझी वसुंधरा अभियान ३.० च्या अनुषंगाने माझा पर्यावरणपूरक गणेशोत्सव सजावट स्पर्धा २०२२ (घरगुती) चे आयोजन करण्यात आले आहे.

सदर स्पर्धेत उत्कृष्ट पर्यावरणपुरक सजावटी करणा-या विजेत्यांना अनुक्रमे प्रथम क्रमांक – ५०००, द्वितीय क्रमांक – ३०००, तृतीय क्रमांक – २००० व उत्तेजनार्थ -१००० पारितोषिके वितरण करण्यात येणार आहे.

सदर स्पर्धेसाठी आवश्यक अर्ज नगर परिषद कार्यालयात वाहन विभागात दिनांक ३० ऑगस्ट २०२२, सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत निःशुल्क उपलब्ध आहेत. तरी रत्नागिरी शहरातील जास्तीत जास्त नागरिकांनी स्पर्धेत सहभाग घ्यावा असे आवाहन श्री. तुषार बाबर, प्रशासक तथा मुख्याधिकारी रत्नागिरी नगर परिषद यांनी केले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
05:44 PM 25/Aug/2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here