गांडूळ खताचा प्रकल्प उभारून बचत समुहाने त्यातून अर्थार्जन करावे : प्रशांत राऊत

0

गुहागर : दिवसेंदिवस रायायनिक खताचे दुष्परिणाम आपल्या जाणवत असल्याने आता सेंद्रिय खत वापरण्याकडे शेतकरी वळत आहेत. त्यामुळे गांडूळ खताला शेती बागायती साठी अनन्यसाधारण महत्त्व आहे.

म्हणून गांडूळ खताचे प्रकल्प उभारून बचत समुहाने त्यातून अर्थार्जन करावे, असे आवाहन पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रशांत राऊत यांनी केले. गहागर पंचायत समिती कृषी विभाग व राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या संयुक्त विद्यमाने असगोली येथील व्याघ्रांबरी बचत गटाच्या गांडूळ खत प्रकल्पावर आयोजित ‘हळद लागवडीत गांडूळ खताचा वापर’ व ‘गांडूळ खताचे प्रात्यक्षिकातून प्रशिक्षण’ आयोजित करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होतेे .यावेळी गट विकास अधिकारी प्रशांत राऊत यांच्या सोबत

सहाय्यक गट विकास अधिकारी प्रमोद केळस्कर, कृषी अधिकारी आर.के.धायगुडे, कृषी विस्तार अधिकारी गजेंद्र पौनीकर , राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या राहिला बोट ,नरेगाच्या तांत्रिक अधिकारी नयना जाधव व्याघ्रांबरी बचत समुहाच्या अध्यक्षा सुजाता कावणकर, रंजना कावणकर, वाळुकेश्वर समुहाच्या अध्यक्षा स्मिता बागकर इ. उपस्थित होते.यावेळी सहाय्यक गट विकास अधिकारी प्रमोद केळस्कर यांनीही व्याघ्रांबरी बचतसमुहाचं कौतुक करताना सांगितले कि गेली १७ वर्ष या बचत समुहाचा हा गांडूळ खताचा प्रकल्प यशस्वीपणे सुरू आहे. या बचत समुहाचा आदर्श व मार्गदर्शन घेवून आपल्याआरे, वेळंब, कोतळूक, कौंढरकाळसूर येथे ३-४ गांडूळ खताचे प्रकल्प उभे राहावेत त्यासाठी पंचायत समितीच्या कृषी व राष्ट्रीय ग्रामिण जिवनोन्नती अभियान विभागाचे कायम सहकार्य राहील,असेही अभिवचन श्री. केळस्कर यांनी यावेळी दिले. कृषी अधिकारी आर.के धायगुडे व कृषी विस्तार अधिकारी गजेंद्र पौनीकर यांनी गांडूळ खत निर्मितीचे प्रात्यक्षिक दाखविले.त्याचबरोबर गांडूळ खत तयार होणे,खत चाळणे व विक्री व्यवस्थेबाबत मार्गदर्शन केले.

यावेळी आरे येथील स्वामी समर्थ बचत समुह,कौढर काळसूर येथील वाघजाई देवी बचत समुह, महाकाली व इतर बचत समुहातील महिलांनी प्रशिक्षण घेतले. व्याघ्रांबरी बचत समुहातील विजया कोळंबे,अनिता कावणकर, मनाली कावणकर,रत्नप्रभा रामाणे, सुप्रिया घाणेकर,मनाली कावणकर,श्रेया कोळंबे, अनुष्का घाणेकर,सानिका घाणेकर,कल्पना कावणकर,मयुरी कावणकर शिल्पा कावणकर या बचत समुहातील महिलांनी प्रशिक्षण कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.याप्रसंगी गुलाब पुष्प देवून मान्यवरांचा सत्कार करण्यातआला.आभार प्रदर्शन आर.के.धायगुडे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here