केशरी कार्ड धारकांनासुद्धा धान्य देण्याबाबत ना. उदय सामंत यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

0

रत्नागिरी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाऊन काळात जिल्ह्यातील कुठलाही नागरिक उपाशी राहता कामा नये यासाठी अन्न नागरी पुरवठा विभागाकडून विविध उपाययोजना केल्या आहेत. जिल्ह्यात १ ते ५ एप्रिल या पाच दिवसात तब्बल १ लाख ७ हजार शिधापत्रिका धारकांना तब्बल २५००० क्विंटल अन्नधान्याचे वाटप करण्याचा उच्चांक गाठला असल्याची माहिती रत्नागिरीचे जिल्हा पुरवठा अधिकारी महेश पाटील यांनी दिली आहे. तसेच उरलेल्या ३ कोटी ८ लाख केशरी कार्ड धारकांनासुद्धा एप्रिल ते जून या दरम्यान सवलतीच्या दरात धान्य देण्याची ना. उदय सामंत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी केली आहे.

IMG-20220514-WA0009

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here