काँग्रेस पक्षाच्या लांजा तालुकाध्यक्षपदी श्रीकृष्ण हेगिष्ट्ये

0

लांजा : लांजा तालुका काँग्रेस कमिटीच्या प्रभारी तालुका अध्यक्षपदी श्रीकृष्ण उर्फ बब्या हेगिष्ट्ये यांची निवड करण्यात आली.

बुधवारी झालेल्या तालुका काँग्रेसच्या बैठकीत जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांनी हेगिष्ट्ये यांना ही निवड झाल्याचे पत्र प्रदान केले. लांजा तालुका काँग्रेसची बैठक जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.

लांजा तालुका काँग्रेस अध्यक्षपदी कार्यरत असलेले शांताराम गाडे यांनी आपल्या वैयक्तिक कारणास्तव पदाचा राजीनामा दिला होता. यामुळे गेले अनेक दिवसांपासून तालुकाध्यक्षपद रिक्त होते. अनेक दिवसांपासून रिक्त झालेल्या या पदावर कोणाचीही नियुक्ती झालेली नव्हती. यामुळे पक्षाचे कामकाज थंडावले होते. नुकत्याच झालेल्या या बैठकीला हरेश जाधव, भगवान ढेकणे, श्री. जाधव, अनिरुद्ध कांबळे आदींसह तालुका काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here