12 वी व 10 वी प्रमाणपत्र परीक्षेसाठी विलंब व अतिविलंब शुल्कासह अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध

0

ठाणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत उच्च माध्यमिक (इ.12वी) व माध्यमिक शालान्त (इ.10 वी) प्रमाणपत्र परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना फॉर्म नं. 17 भरून खाजगी विद्यार्थी म्हणून सन 2023 परीक्षेसाठी दि. 24 ऑगस्ट 2022 पर्यंत नावनोंदणी अर्ज ऑनलाईन पध्दतीने नियमित शुल्कासह स्विकारण्यात येत आहे. जे विद्यार्थी अर्ज करू शकले नाहीत, त्यांना विलंब व अतिविलंब शुल्कासह नावनोंदणी करण्याची मुदत वाढविण्यात आली असल्याचे विभागीय मंडळाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

खाजगी विद्यार्थी म्हणून इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेसाठी नियमित विद्यार्थी म्हणून नाव नोंदणी करण्याची अंतिम मुदत दि.31 ऑक्टोबर 2022 आहे. या कालावधीत अर्ज करू न शकलेल्या विद्यार्थ्यांना खालील प्रमाणे विलंब व अतिविलंब शुल्क भरून ऑनलाईन नावनोंदणी अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

इ.10वीच्या विद्यार्थ्यांना प्रती विद्यार्थी शंभर रुपये विलंब शुल्क भरुन तर इयत्ता. 12 वीच्या विद्यार्थ्यांना प्रतिविद्यार्थी 25 रुपये विलंब शुल्क भरून गुरुवार दि. 1 सप्टेंबर 2022 ते 30 सप्टेंबर 2022 पर्यंत नावनोंदणी करता येईल. तसेच प्रती विद्यार्थी प्रती दिन 20 रु. प्रमाणे अतिविलंब शुल्क भरुन दि. 1 ऑक्टोबर 2022 ते 31 ऑक्टोबर 2022 पर्यंत इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेसाठी नावनोंदणी अर्ज स्विकारण्यात येणार आहेत.

नावनोंदणी अर्ज ऑनलाईन पध्दतीनेच भरण्यासाठी दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी https://form17.mh-ssc.ac.in व व इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी https://form17.mh-hsc.ac.in या संकेतस्थळांचा वापर करावा. अर्ज भरण्यासाठीच्या सूचना संकेतस्थळावर मराठी/इंग्रजीमधून उपलब्ध आहेत. त्या वाचून अर्ज भरण्यात सुरुवात करावे. ऑनलाईन अर्ज भरताना कोणतीही तांत्रिक अडचण आल्यास कार्यालयीन वेळेत दूरध्वनी क्र.०२०- २५७०5२०७/२५७०५२०८ वर व तसेच इतर बाबींसाठी 25705271 वर संपर्क साधावा, असे राज्य मंडळाचे सचिव यांनी कळविले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:48 PM 27/Aug/2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here