- मी पंतप्रधानांना किमान आधारभूत किंमतीत धान्य यासाठी मिळावे अशी विनंतीही केली आहे.
- केशरी शिधापत्रिका धारक मध्यमवर्गीय आहे त्यांच्यासाठी 3 किलो गहू 8 रुपये किलो दराने व 2 किलो तांदूळ 12 रुपये किलो दराने देण्यासंदर्भात आम्ही निर्णय घेतला आहे.
- निवारा केंद्रात 6 लाख लोकांना दिवसांतून दोन वेळचे जेवण आणि नाश्ता देत आहोत.
- जे गरीब आहेत, गरजू आहेत त्यांच्यासाठी आपण राज्यात शिव भोजनाची सोय केली आहे.
- मला खात्री आहे, आपण निश्चित बाहेर पडणार.
- आपण जर असाच दक्षतेने सामना केला तर आपल्याकडे देखील ही परिस्थिती बदलेल.
- चीनच्या वुहान मध्ये निर्बंध आता उठविण्यात आले आहेत, ही दिलासा देणारी बातमी आहे.
- त्यासाठी आपली पूर्ण ताकद, हिम्मत लागणार आहे.
- योगासने, हलके फुलके व्यायाम करा. कारण हे युद्ध आपण जिंकणारच आहोत पण यानंतरचे युद्ध घसरणाऱ्या अर्थव्यवस्थेशी आहे.
- घरी राहा पण तंदुरुस्त रहा
- ज्यांना ज्यांना ह्रदयविकार, मधुमेह, स्थूलपणा आहे त्यांनी अधिक काळजी घ्या. बंधने ठेवा, कारण हे सर्व हाय रिस्क ग्रुप मध्ये आहेत्
- माझे टीव्ही वाहिन्यांना देखील आवाहन आहे की कोरोनाच्या बातम्या तर आहेतच पण नागरिक तणावमुक्त राहतील आणि वातावरण हलकेफुलके राहील असे कार्यक्रम दाखवा.
- घरातले वातावरण आनंदी ठेवा.
- लॉकडाऊन मुळे आपली गैरसोय होते आहे. त्यासाठी मी दिलगिरी व्यक्त करतो पण हे युद्ध जिंकायचे असेल तर आपली घरे हेच गड किल्ले आहेत असे समजा.
- कोरोना आपल्यामागे लागला आहे पण आपण ही सर्व जण कोरोनाच्या मागे ‘हात धुवून’ लागलो आहोत.
- आपल्याकडे मला रुग्णांमध्ये थोडीशीही वाढ नको असे मी सांगितले आहे.
- आपल्याकडे रुग्णांचे आकडे वाढताहेत ही वस्तुस्थिती आहे, चिंतेची बाब असली तर घाबरून जाऊ नका. आपण सर्व ताकदीनिशी प्रयत्न करीत आहोत.
- मला कल्पना आहे कोरोनाचा रुग्ण आपल्या राज्यात सापडून आता ४ आठवडे पूर्ण झाले.
- कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी एक टीम म्हणून त्यांनी बऱ्याच सुचना केल्या आहेत.
- काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत सर्व जण मास्क लावून बसलेले छायाचित्र आपण पाहिले असेलच. ही पहिली अशी व्हीडीओ कॉन्फरन्स होती. सर्व मंत्र्यांनी एकमेकांत अंतर पाळले होते, मात्र मानसिकदृष्ट्या आम्ही एक होतो आणि आहोत.
- कोरोनाच्या लढाईत आरोग्य यंत्रणा, पोलीस अहोरात्र काम करताहेत, मी आपल्या यंत्रणेतील सर्व विभागांना धन्यवाद देतोय.
