लांजा तालुक्यातील शिवसैनिकांनी सामाजिक बांधिलकी जपत केली मुख्यमंत्री सहाय्यता निधीस मदत

0

लांजा : खा. विनायक राऊत ह्यांच्या मार्गदर्शनाखाली व माजी जिल्हापरिषद सभापती दत्ताजी कदम साहेबांनी वाढदिवसाच्या निमित्ताने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन लांजा तालुक्यातील शिवसैनिक यांनी कोरोना आपत्तीला तोंड देण्यासाठी प्राथमिक स्वरूपात रक्कम रुपये ५१०००/- गोळा करून त्यापैकी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस रक्कम रुपये २५०००/- व लांजा कोरोना मदतनिधी म्हणून मा. तहसिलदार यांच्याकडे रोख रक्कम रुपये १००००/- जमा केले. तसेच निधीमधून लांजा तालुका पोलीस यंत्रणा, आरोग्य यंत्रणा यांना सहकार्य करण्याचा व १०० ते १५० गरजुंना १ महिना पुरेल एवढे अन्नधान्य पुरवण्याचा संकल्प आज दिनांक ८ एप्रिलला करण्यात आला. संकल्प सिद्धीस नेण्याकरिता लांजानगरीचे नगराध्यक्ष मनोहर बाईत ,शिवसेना देवधे विभागसंघटक रविंद्र डोळस, DRDA समिती सदस्य योगेश पाटोळे, पंचायत समिती सदस्य श्रीकांत कांबळे, अनिल कसबले, शिवसहकार उपतालुका संघटक रविकांत शिखरे, उपविभागप्रमुख राजेंद्र पालिये, युवासेना तालुका समन्वयक निखिल माने, सरपंच शशिकांत कदम, देवेंद्र लोटनकर, स्वप्नील शिंदे, संतोष धामणे, शिवसहकार उपविभाग संघटक राजू घडशी, विलास बेर्डे, शाखाप्रमुख राजेंद्र सुर्वे, संतोष लिंगायत, महेंद्र राऊत, महेश शिंदे, दिलीप चव्हाण, संदीप सावंत, प्रसाद जठार, श्रेयस शेट्ये, भालचंद्र बोडस, रणजित गांगण, उद्योजक राजुदादा जाधव, युवासेना शाखाधिकारी निलेश कातकर, राजू बाने, राजू शेरे, विठ्ठल इंगळे, प्रकाश गुरव, सुरेश भालेकर हे योगदान देत आहेत.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here