रत्नागिरी जिल्ह्यातील पोलिसपाटील दोन महिने मानधनाविना

0

खेड : जिल्ह्यातील पोलिसपाटील गेले दोन महिने मानधनाच्या प्रतीक्षेत असून किमान गणेशोत्सवापूर्वी तरी मानधन शासनाने द्यावे, अशी मागणी पोलीस पाटील संघटनेने केली आहे.

कोकणातील महत्त्वाचा उत्सव असलेल्या गौरी गणपतीच्या सणाला अवघे दोन दिवस उरले आहेत. चाकरमानी गावागावात दाखल होत आहेत. संपूर्ण कोकणात उत्सवाचे वातावरण तयार झाले असले तरी महसूल, गृह विभाग आणि सामान्य जनतेचा दुवा असलेला पोलिस पाटील मानधनाच्या प्रतीक्षेत आहे. जिल्ह्यातील बहुताश पोलीस पाटील शेती वर मिळणाऱ्या तुटपुंज्या उत्पन्नातून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत असतात. कोणत्याही ठोस पगाराविना हा घटक दिवसरात्र शासनाचे काम इमानेइतबारे करत असतो. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गावात कोणतीही अडचण उद्भवू नये, यासाठी दक्ष असणाऱ्या पोलिस पाटलाना जून -जुले महिन्याचे मानधन अदा करण्यात आले नाही.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:43 AM 30/Aug/2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here