दसरा मेळाव्यावरून उद्धव ठाकरे-शिंदे गटात रस्सीखेच; मनसेने लगावला टोला

0

मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून शिवाजी पार्कवर होणाऱ्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावरून अनेक तर्क-वितर्क लढवले जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बंडखोरी केल्यानंतर मोठे भगदाड शिवसेनेला पडले आहे.

मात्र, आम्हीच शिवसेना असल्याचा दावा शिंदे गटाकडून केला जात आहे. यातच शिवाजी पार्कवर होणारा शिवसेनेचा दसरा मेळावा शिंदे गट हायजॅक करण्याच्या प्रयत्नात असल्याच्या चर्चा सुरू आहे.

शिवसेना आणि दसरा मेळावा असे एक अतूट नाते असून, या निमित्ताने दादरच्या शिवाजी पार्क मैदानात होणाऱ्या शिवसेनेच्या सभेला राज्यातील कानाकोपऱ्यातून शिवसैनिक उपस्थिती लावतात. मात्र, यंदा शिवाजी पार्क मैदानात नेमका कोणी मेळावा घ्यायचा, यावरून उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. याचदरम्यान मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी दसरा मेळाव्याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

‘शिवतीर्थ’वर होणारा दसरा मेळावा म्हणजे बाळासाहेबांच्या विचारांचे सोने लुटणे…आजच्या घडीला दोन्ही गटांचे त्यावरून घमासान चालू आहे. पण त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, ‘वारसा’ हा वास्तूचा नसतो, तर विचारांचा असतो’…, असं म्हणत संदीप देशपांडे यांनी टोला लगावला आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:43 AM 30/Aug/2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here