NEET च्या अभ्यासक्रमात कोणताही बदल झालेला नाही

0

रत्नागिरी : NEET च्या अभ्यासक्रमात कोणताही बदल झालेला नाही, असे नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने स्पष्ट केले आहे. सोशल मीडियावर नीटचा सिलॅबस बदलल्याच्या फेक न्यूज पसरत आहेत. या पार्श्वभूमीवर एनटीएने हे परिपत्रक जारी करून स्पष्टीकरण दिले आहे. देशभरातील वैद्यकीय महाविद्यालयांमधील MBBS, BDS या वैद्यकीय आणि दंत वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी नॅशनल एलिजिबिलीटी कम एन्ट्रन्स टेस्ट अर्थात NEET ही प्रवेश परीक्षा घेतली जाते. एनटीएने असेही स्पष्ट केले आहे की एनटीए हा अभ्यासक्रम ठरवतच नाही, अभ्यासक्रम निश्चित करण्याचे काम मेडिकल काऊन्सिल ऑफ इंडिया करते आणि हा सिलॅबस एमटीआयच्या mciindia.org या संकेतस्थळावरून घेता येईल. त्यामुळे विद्यार्थ्यांनी एनटीएच्या अधिकृत संकेतस्थळावर नियमितपणे नीट परीक्षेबाबतच्या वेळोवेळी दिलेल्या सूचना पाहाव्यात, असे आवाहनही एनटीएने केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here