जिल्हा रुग्णालयात निर्जंतुकीकरणासाठी सॅनिटायझर डोम

0

रत्नागिरी : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या संकल्पनेतून येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात सॅनिटायझर डोम आणि संपर्क मुक्त स्वॅब नमुना गोळा करणाऱ्या कक्षाची निर्मिती करण्यात आली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर सॅनिटायझर डोम उभारण्यात आला आहे. या स्वयंचलित डोमला सेन्सर बसवण्यात आलेले आहेत. यात येणारी व्यक्ती दाखल होताच निर्जंतुकीकरण द्रावणाचा फवारा सुरू होतो, तो या दोन मीटरच्या कक्षातून बाहेर पडेपर्यंत सुरू राहतो, ज्यामुळे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तींचे निर्जंतुकीकरण शक्य होत आहे, अशी माहिती हेल्पिंग हँड्सचे कार्यकर्ते संजय वैशंपायन यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here