जमातुल मुस्लिमीन शृंगारी, शृंगारतळीकडून गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

0

गुहागर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात लॉकडाऊन आहे. परिणामी घरीच बसावे लागत असल्याने अनेकांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याप्रमाणेच गुहागर तालुक्यातील अनेक रोजंदार करणाऱ्या कुटुंबांचीही तीच अवस्था झाली आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन जमातुल मुस्लिमीन शृंगारी शृंगारतळी, ता.गुहागर ने अशा गरजवंत व्यक्तींच्या माहिती घेऊन जवळपास 185 गरजवंत कुटुंबाला 1,75,000/- चे अत्यावश्‍यक साहित्यांचे वाटप केले. यामध्ये तांदूळ, गहू, कांदे, बटाटे, तेल, साखर, मीठ, डाळी, कडधान्य, मिरची पावडर, चहा पावडर, लसूण, हळद अशा वस्तूंचा सामावेश होता. अशावेळी लोकांच्या चेहरावर समाधान दिसून येत होते. यावेळी उपस्थित सर्कल श्री. माखजनकर, पाटपन्हाळे गावचे तलाठी श्री.गोंधळेकर, श्री.रवी भेकरे, शृंगारी गावचे अध्यक्ष श्री.हुसैन बोट, शाबीर भाय साल्हे, अहमद केळकर, नासिम साल्हे, युनूस मुल्लाजी, आसिम साल्हे, अशफाक मुल्लाजी, इब्राहिम धामस्कर, बावा साल्हे, अहमद धामस्कर, रज्जब घारे, कादीर साल्हे, अब्बास केळकर उपस्थित होते.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
4:40 PM 08-Apr-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here