गुहागर मनसेच्या वतीने गणेश सजावट स्पर्धा

0

गुहागर : महाराष्ट्र नवनिर्माण सेना, गुहागर तालुक्याच्या वतीने तालुकास्तरीय पर्यावरणपूरक ऑनलाईन गणेश सजावट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

यामध्ये दि.३१ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर या कालवधीत इच्छूकांनी स्वत:समवेत आपल्या घरातील सजावटीची तीन छायाचित्रे आणि एक ते दीड मिनिटांचा व्हिडीओ (वेगवेगळ्या अँगलमध्ये काढून सांस्कृतिक विभाग अध्यक्ष राहुल जाधव, सुरेंद्र निकम (दोडवली शाखा अध्यक्ष), रितेश कळझुनकर (आरे शाखा अध्यक्ष), अविनाश वाघे (भातगाव शाखा अध्यक्ष), रुपेश बारगोडे येथे पाठवावीत.

या स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क नसून प्रथम पारितोषिक २ हजार २२२ रु. व सन्मानचिन्ह, द्वितीय पारितोषिक १ हजार ५५५ रु व सन्मानचिन्ह, तृतीय पारितोषिक १ हजार १११ रु.सन्मानचिन्ह, उत्तेजनार्थ ५५१ रु.व सन्मानचिन्ह त्याचप्रमाणे सहभागी होणाऱ्या प्रत्येक स्पर्धकास सन्मानपत्र देण्यात येते.

या स्पर्धेत सर्वांनी भाग घ्यावा, असे आवाहन गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी, गुहागर तालुका अध्यक्ष विनोद जानवलकर यांनी केले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:07 AM 01/Sep/2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here