वाशिष्ठी किनारी गणेश विसर्जन घाटाची पाहणी

0

चिपळूण : शहरातील बहादूरशेख येथील वाशिष्ठी नदीपात्रात गणेश मूर्ती विसर्जनासाठी सुरक्षित जागा करण्याबाबतचे नियोजन करण्याची मागणी माजी सभापती शौकत मुकादम, कळंबस्तेचे सरपंच विकास गमरे यांनी प्रशासनाकडे केली. त्यानुसार वाशिष्ठी नदीपात्रानजिक जागेची पाहणी करून योग्य नियोजन करण्यासाठी नगर परिषद व पोलिस प्रशासनाने आश्वासन दिले. महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरू गणेशमूर्ती विसर्जनासाठी भक्तांना कोणताही त्रास होऊ नये व अडथळा येऊ नये, तसेच जुन्या पुलावरून वाशिष्ठी नदीपात्रानजीक गणेशमूर्ती नेण्याबाबत योग्य सुरक्षित मार्ग करावा, अशी मागणी करून त्या बाबतचे नियोजन व पाहणी संबंधितांकडून करण्यात आली.

यावेळी शौकत मुकादम यांच्यासह उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन बारी, पोलिस निरीक्षक रवींद्र शिंदे, मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे, प्रशासकीय अधिकारी अनंत मोरे, कळंबस्तेचे सरपंच विकास गमरे आदींनी पाहणी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here