जि. प.च्या प्रयत्नांनी विद्यार्थांना घरबसल्या घेता येणार शिक्षण

0

रत्नागिरी : सध्या लॉकडाऊन मुळे लहान थोरांपासून सगळेच येणारा वेळ कसातरी घालवत आहेत. लहान मुलं शिक्षणापासून वंचित आहेत. कोरोनामुळे सर्व बच्चे कंपनी घरातच असल्याने एरव्ही हव्याहव्याशा वाटचाऱ्या सुट्टीचा मुलांना आता कंटाळा येऊ लागला आहे. त्यामुळे लहान मुलांचा विचार डोळ्यासमोर ठेवून जि. प. अध्यक्ष रोहन बने, शिक्षण सभापती सुनील मोरे यांनी ऑनलाईन धडे सुरू करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. जिल्हा परिषदेची ही ऑनलाईन धडे ही बाब शिक्षण विभागाने स्वतंत्र वेबसाईट तयार केली आहे. या वेबसाईटवर विविध शिक्षण तज्ज्ञांचे शैक्षणिक संदर्भातील व्हिडिओ दाखवण्यात येणार आहेत. त्याचबरोबर ऑनलाईन धडे देण्यासाठी काही शिक्षकांची नेमणूक करण्यात येणार आहे. या सर्व उपक्रमांबाबत मंगळवारी प्राथमिक चर्चा झाली आहे. या उपक्रमामध्ये विद्यार्थ्याबरोबरच पालकांनाही सहभागी करून घेण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here