महत्वाची बातमी : यानंतरच होणार नगरपालिका निवडणुका…

0

मुंबई : एकीकडे राज्यात रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरात लवकर घेण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला असताना प्रत्यक्षात मात्र निवडणुका लांबणीवर पडण्याचीच चिन्हं आहेत. त्यातच शिंदे-फडणविस सरकारच्या कॅबिनेट बैठकीत ठाकरे सरकारचा आणखी एक निर्णय रद्द करत नव्या सरकारनं पुन्हा एकदा प्रभाग रचनेत बदल करण्याचा निर्णय घेतलाय. महापालिकेत महापौर नाही, नगरपालिकेत नगराध्यक्षनाहीत, नगरसेवक नाहीत. अनेक महापालिकांची मुदत उलटूनही अनेक महिने उलटलेत. पण सगळा कारभार प्रशासकाच्या हाती. त्यामुळे, शहरातल्या नागरी समस्या सोडवण्या करता तातडीनं निवडणूका हव्यातच…पण पुन्हा एकदा महापालिका, नगरपंचायत आणि जिल्हा परिषद निवडणूका लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. त्यातच आता एक महत्वपूर्ण माहिती मिळत असून यानुसार जोपर्यंत धनुष्यबाण चिन्ह गोठवले जात नाही अथवा शिंदे गटाला मिळत नाही तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा डाव असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात होऊ लागली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here